चिखलीतील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

 

चिखलीतील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा, दि. 17 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, चिखली येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ अशा विविध आरक्षित प्रवर्गांतील पात्र विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे.

नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालये व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार असून, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट (हार्ड कॉपी) वसतिगृहात प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे.

या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अथवा अर्जासंदर्भात मदतीसाठी संपर्क क्रमांक : ९५०३२२८९८२ क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट वसतिगृहाला भेट द्यावी,असे आवाहन प्रभारी गृहपाल पुनम तारासिंग राठोड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या