एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक ; बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक
एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक ;
बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक
बुलढाणा,दि.25 : सिंगापूर येथे दि.15 ते 20 जून दरम्यान एशिया कप स्टेज टू तिरंदाजी स्पर्धा पार
पडल्या. या स्पर्धेत भारतीय संघाला रौप्य पदक मिळाले असून या संधात सहभागी असलेल्या
बुलढाण्याचा तिरंदाज मिहीर नितीन अपार याने जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली.
भारतीय संघामध्ये बुलढाण्याचा
तिरंदाज मिहीर नितीन अपार हरियाणाचा कुशल दलाल व आंध्र प्रदेशचा गणेश मनीरत्नम यांचा
समावेश होता. मिहीर अपार याने यापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे
प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड
चॅम्पियनशिप कॅनडासाठी सुद्धा मिहीर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिहीरच्या
या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत असून जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनीही यावेळी
कौतूक करुन शुभेच्छा दिल्या. मिहीरने आपल्या या यशाचे श्रेय कोच चंद्रकांत सलग आणि
त्यांच्या आई-वडिलांना दिले आहे.
Comments
Post a Comment