26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा
26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा
बुलढाणा, दि. 25 (जिमाका): भ्रष्टाचार निर्मूलन व प्रशासनातील पारदर्शकतेसाठी शासन परिपत्रकान्वये गठीत आणि जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि.26 व दि. 27 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.26 जून 2025 रोजी दुपारी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडणार आहे. तर, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि. 27 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सभागृहात होणार आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी ज्या व्यक्तींना तक्रारी सादर करावयाच्या असतील, त्यांनी स्पष्ट शब्दांत व सबळ पुराव्यांसह प्रतिज्ञापत्रावर तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. समिती समोर उपस्थित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व पुराव्यांसह तक्रारी पूर्वतयारीनिशी सादर कराव्यात, जेणेकरून भ्रष्टाचारविरोधी लढ्यात ठोस निर्णय घेता येतील.
जिल्ह्यातील नागरिकांनी या समित्यांच्या माध्यमातून प्रशासनातील पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment