बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला
राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि. 13 व 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दि. 17 जून 2025 रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार बुलडाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे आरक्षण सोडत 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा निवडणूक इमारत, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

या सभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासोबतच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्ग महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या प्रक्रियेस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या