राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त "सामाजिक न्याय दिन" उत्साहात साजरा होणार
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त "सामाजिक
न्याय दिन" उत्साहात साजरा होणार
· समता दिंडीचे आयोजन
बुलढाणा, दि. 24 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू
महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन निर्णयानुसार 26 जून हा दिवस "सामाजिक
न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने यंदा दिनांक 26 जून रोजी
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी समता दिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले असून, सकाळी 8 वाजता
जिल्हा परिषद, बुलढाणा येथून या दिंडीला प्रारंभ होणार आहे. शहरातील मुख्य
मार्गाने ही दिंडी फिरून पुन्हा जिल्हा परिषद कार्यालयात समारोप होईल. सामाजिक
समतेचा संदेश देणारी ही दिंडी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
त्यानंतर, सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. या कार्यक्रमात सामाजिक न्याय, समता आणि प्रगतीच्या विषयावर मार्गदर्शनपर
विचार मांडले जाणार आहेत.
"समतेचा जयघोष, सामाजिक न्यायाचा संकल्प" या
भावनेतून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन राजर्षी शाहू महाराजांना
अभिवादन करावे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे
आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment