पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ
सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी पाणी
पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे
पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
नागझरी येथे 1 हजार 18 लोकसंख्येसाठी
एक टॅंकरद्वारे 16 हजार 360 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता
टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात
यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर
नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी
प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment