निमगाव वायाळ तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित*
निमगाव
वायाळ तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित*
बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर
केलेले आहे. त्यानुसार सन 2025-26 वर्षाकरिता, बुलढाणा जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ 10 हेक्टर तलावाच्या निर्धारित कार्यक्षेत्रातील
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय, अटी व शर्तीनुसार तलाव मासेमारी ठेक्याने
देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका घेण्यासाठी
आवश्यक कागदपत्रांसह दि. 24 जून 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक),
बुलढाणा येथे सादर करावेत.
सन 2025-26 करीता बुलढाणा जिल्ह्यातील 10 हेक्टर क्षेत्रफळाचा निमगाव वायाळ तलाव
मासेमारी ठेका दि. 30 जून 2025 रोजी संपुष्टात येत आहे. सदर तलावाच्या कार्यक्षेत्रातील
योगेश मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. केशवशिवणी यांनी तलाव घेण्यास नकार दिल्यामुळे
हा तलाव अन्य पात्र संस्थांना देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी
संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण प्रस्ताव सादर करावेत.
आवश्यक कागदपत्रे : विहीत नमुन्यातील तलाव
ठेका मागणी अर्ज (नमुना-1), ठराव व अर्ज, नोंदणी नाहरकत प्रमाणपत्र, उपविधी
व 97 वी घटना दुरुस्तीची प्रत, कार्यरत असल्याचे
प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, संचालक मंडळ यादी, मागील ३ वर्षांचे लेखापरीक्षण
अहवाल, बॅंक स्टेटमेंट (3 वर्षांचे), नफा-तोटा पत्रक (3 वर्षांचे), मत्स्यबीज संचयन व उत्पादन अहवाल (5 वर्षांचा),
इतर उपयुक्त दस्तऐवज (KCC, विमा, ई-श्रम कार्ड
इ.), 4 हजार 500 रुपयांचा धनादेश, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सभासद नसल्याचे
प्रमाणपत्र व अटी-शर्ती हमीपत्र प्रस्तावासोबत
जोडणे आवश्यक आहे.
00000
Comments
Post a Comment