अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकासासाठी ७ लाखांचे अनुदान ! अनुदानित शाळा, क्रीडा संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकासासाठी ७ लाखांचे अनुदान !
अनुदानित शाळा, क्रीडा संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 27 (जिमाका): क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, बुलढाणा मार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सन २०२५-२६ करिता क्रीडांगण
विकासासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती वस्तीत असलेल्या शासकीय व अनुदानित शाळा, क्रीडा संस्था,
स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना विविध कामांसाठी अधिकतम रुपये ७ लाख रुपये इतके
अनुदान मंजूर करण्यात येणार आहे:
ही
कामे करता येतात : क्रीडांगण समपातळीत करणे, २०० मीटर/४०० मीटर धावपट्टी तयार करणे,
कंपाऊंड भिंत/तार घालणे, प्रमाणित मैदान निर्मिती, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी व भांडारगृह
उभारणी, फ्लडलाईट सुविधा, क्रीडा साहित्य खरेदी, प्रेक्षक गॅलरी व शेड बांधकाम, ड्रेनेज
व स्प्रिंकलर यंत्रणा
अटी
व आवश्यक कागदपत्रे: अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांची जमीन ही अनुसूचित जाती वस्तीत
असणे अनिवार्य असून, प्रस्तावासोबत गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तसेच संस्थेच्या
नावाने ७/१२ दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे.
या
योजनेत प्राथम्यक्रमानुसार पात्र संस्थांमध्ये ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद,
सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह, क्रीडा विभागाचे संकुले, पोलीस
कल्याण समिती, शासकीय महाविद्यालये व शिक्षण विभागाच्या अनुदानित संस्था यांचा समावेश
आहे.
अर्ज
करण्याची मुदत : विहीत नमुना अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2025, पूर्ण
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ही 20 ऑगस्ट रोजी असून कार्यालयीन वेळेत प्रस्ताव
स्वीकारले जाणार आहेत.
अधिक
माहितीसाठी व अर्ज नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल,
क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन बि. एस. महानकर, जिल्हा
क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment