जिल्ह्यात आज 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' 25 हजार नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

 जिल्ह्यात आज 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस'

25 हजार नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

बुलढाणा,दि. 30 (जिमाका) : केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाच्या निर्देशानुसार 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान 'वित्तीय समावेशन मोहीम' जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 1 जुलै रोजी 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे.

समाजातील वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये सामावून घेणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार या दिवशी जिल्ह्यातील 25 नागरिकांचे अटल पेन्शन योजनेंअंतर्गत नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँक शाखांना प्रत्येकी 100 अटल पेन्शन योजना नोंदणीचे उद्दिष्ट, तर सर्व बँकिंग प्रतिनिधींना प्रत्येकी 25 नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

अटल पेन्शन योजना ही केंद्र शासनाची योजना असून, 18 ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. या योजनेअंतर्गत नियमित मासिक प्रीमियम भरल्यास वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निश्चित मासिक पेन्शन दिली जाते.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 1 जुलै रोजी आपल्या जवळच्या बँक शाखा किंवा बीसी केंद्रावर जाऊन अटल पेन्शन योजना साठी नोंदणी करावी आणि वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळवावा. तसेच या उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या