मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

 

मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी नोंदवावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प जातीच्या अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा पावसाळी प्रजनन हंगाम जूलै 2025 पासून सुरु होत आहे.  मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर जि. बुलढाणा येथे 15 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मत्स्यकास्तकार, शेतकरी व सहकारी संस्थांनी मत्स्यबीजाची मागणी लेखीस्वरुपात नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु.ग. गावडे यांनी केले आहे.

सर्व मच्छिमारी सहकारी संस्था आणि मत्स्यकास्तकारांनी फक्त शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रातूनच बीज खरेदी करणे बंधनकारक आहे. बीज खरेदीची पावती जवळ ठेवणे आवश्यक असून, ती कोणत्याही शासकीय योजनेच्या लाभासाठी आवश्यक मानली जाणार आहे. बाहेरून, इतर जिल्हा किंवा राज्यातून, खाजगी मार्गाने बीज खरेदीसाठी जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगी अनिवार्य आहे. विनापरवानगी बीज खरेदी आढळून आल्यास शासन धोरणानुसार कारवाई केली जाईल. मत्स्यबीज संचयनाचे पंचनामे करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शेततळ्यातील किंवा तलावातील संचयनासाठी लागणाऱ्या मत्स्यजिरेची मागणी लेखी स्वरुपात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलढाणा येथे त्वरीत नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी सु. ग. गावडे (9284889665), नि. मा. साळुंके, कोराडी केंद्र (9860809711),  इ. तू. देवकत्ते (8669072768) या मोबाईल क्रमांकावर किंवा  कार्यालयाच्या 07262-242254/ 8856929431 क्रमांकावर संपर्क साधावा. मत्स्य उत्पादन वाढीसाठी हे बीज संचयन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्वांनी यामध्ये सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या