जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेबाबत प्रधान सचिवांकडून आढावा
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रभाग
रचनेबाबत प्रधान सचिवांकडून आढावा
बुलढाणा,
दि. २3 जून (जिमाका) – महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 अंतर्गत व
ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा
परिषदेसाठी 61 निवडणूक विभाग व 122 पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना
करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी 20
जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आढावा घेतला.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, प्रभारी तहसीलदार शशिकांत
वाघ व निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा सभेत प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी ग्रामविकास विभागाच्या दि
12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना दि. 14 जुलै 2025
रोजी प्रसिद्ध करण्याचे व त्यावर दि. 21 जुलै 2025 पर्यंत नागरिकांकडून हरकती व
सूचना प्राप्त करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी दि 28
जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांनी प्राप्त हरकतींसह प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा. दि 11 ऑगस्ट 2025 पर्यंत सुनावणी
घेऊन अंतिम निर्णय द्यावा.
दि 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे
निर्देश दिले.
या प्रक्रियेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक
सूचनांनुसार पारदर्शक व काटेकोरपणे करण्याबाबतही प्रधान सचिवांनी स्पष्ट निर्देश
दिले.
00000
Comments
Post a Comment