राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 





राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;

विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

बुलढाणा (जिमाका) दि. 13 : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत  दि. १० व ११ जुन २०२५ रोजी संपुर्ण जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये एकुण ३६ गुन्हयांची नोंद करण्यात आलेली असुन ३६ आरोपींसह हातभट्टी ३७१ लि. रसायन ८३५७ लि. देशी मद्य ११७.७२ लि. व विदेशी मद्य ३५.८२ लि. यासह एकुण ५ लक्ष ९८ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

 

            आयुक्त,रा.ऊ.शु.म.रा.मुंबई डॉ.राजेश देशमुख,  जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील,  अधीक्षक, रा.ऊ. शु. बुलढाणा डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात दि. १० व ११ जुन २०२५ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ईश्वर नारायण वाघ निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली  बुलढाणा शहरातील भीलवाडा,आंबेडकर नगर, कैकाळीपुरा या भागात अवैध हातभट्टीवर १२ वारस गुन्हे नोंदवुन १३३ लि हातभटटी व ३११४ लि रसायनासह एकुण १ लक्ष ६० हजार १७५ हजार रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. बोज्जावार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ्.प. बुलढाणा यांनी भादोला, डोंगरखंडाळा या भागात अवैध मद्य विक्री ७ वारस गुन्हे नोंदवुन १३१ लि हातभट्टी  व - ३३९२ लि रसायन व ४.३२ लि देशी व सह एकुण १ लक्ष ५६ हजार २८० रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. व्ही एम. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव यांनी मनसगाव,शेगाव, देवधाबा मलकापुर या भागात अवैध हातभट्टी व मद्यविक्री ८ वारस गुन्हे नोंदवुन १०७ लि हातभटटी व १८५१ लि रसायन व ११.९७ लि देशी व सह एकुण १ लक्ष ५६ हजार ८० रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. रोकडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चिखली व  रोटे दु. नि. दे. राजा - १ व नयना देशमुख दु नि दे.राजा-२ व  भगत यांनी चिखली, देउळगावराजा भागामध्ये अवैध मद्य विक्री ९ वारस गुन्हे नोंदवुन ६८.४० लि देशी व २५.९२ लि. विदेशी सह एकुण १ लक्ष २६ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला.

 

            पुढील काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन अवैध हातभट्टी  केंद्रावर अशाच प्रकारे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या परीसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट निर्मीती आढळल्यास या विभागास टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ कळवावे. तसेच बुलढाणा जिल्हयातील किरकोळ व ठोक विक्री मद्य अनुज्ञप्तीधारक यांच्या अनुज्ञप्तीमध्ये जर बनावट मद्य आढळुन आले तर त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांना किंवा आपले जागेचा वापर अवैध धाबा चालवीण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या