मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मलकापूर प्रवेश प्रक्रिया सुरू

 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मलकापूर प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा जिल्हा बुलडाणा अधिनस्त 125 व्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मलकापूर जि.बुलडाणा येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता सरु करण्यात आलेली आहे.

मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील, अनु.जाती, अनु जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थीनी प्रवेशास पात्र असतील. शालेय, कनिष्ठ, विद्यालयीन व महाविद्यालयीन मलकापूर येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थीनी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील.

प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येईल. अर्ज भरण्याकरीता https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा. याअनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थीनींनी प्रवेश अर्ज भरावे. तसेच अधिक माहिती करीता 9423761403 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी, असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल अरुण इंगळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या