आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह बुलढाणा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 

आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह बुलढाणा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 बुलडाणा, (जिमाका) दि. 23:  आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहात शैक्षणिक सत्र 2025-2026 वर्षाकरीता अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील विद्यार्थ्याकरीता इयत्ता 11 वी व पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरीता वसतीगृह प्रवेश अर्ज सुरू झालेले आहे.

वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांनीनां निवासासोबत शासनाचे आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांनीच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट डिबीटीव्दारे निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल भत्ता व अभ्यासक्रमानुसार इतर शैक्षणिक भत्ते रक्कम देण्यात येते.

प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे (एस.टी.) प्रमाणपत्र, (कास्ट सर्टीफीकेट) जातीचे वैद्यता प्रमाणपत्र.(व्यवसायिक अभ्यासक्रमाकरीता), शाळा सोडल्याचा दाखला (टि.सी.) गुणपत्रिका,बुलढाणा शहरातील प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ विद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयाचे बोनाफाईड,वर्ग.10 वीची गुणपत्रिका, फिटनेस मेडीकल सर्टीफीकेट, उत्पन्नाचा दाखला (सन. 2024-2025) आधार कार्ड, स्वःतचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधारसंलग्न बँक खाते पासबुक किंवा पोस्ट बँक पासबुकची झेरॉक्स रहिवासी दाखला, पासपोर्ट साईजचे फोटो इत्यादी अचूकपणे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वतःचाच किंवा पालकांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा.

आँनलाईन अर्जामध्ये स्वतःचे नाव नोंदणी करतांना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतत असावे आधार क्रमांकाची नोंद करतांना तो स्थगीत झाला नसल्याची खात्री करून घ्यावी.

विद्यार्थ्यांनीनी आँनलाईन अर्जामध्ये बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापुर्वी सदर बँक खाते सुरू असल्याची प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करण्यात यावी.

वसतीगृह प्रवेशाकरीता अधिक माहितीसाठी वसतीगृह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करावा. तरी इच्छूक अनुसूचित जमाती (एस.टी.) च्या विद्यार्थ्यांनीनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरून हार्डकॉपीसह विहीत शैक्षणिक कागदपत्रे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, राऊत मंगल कार्यालय, सर्वयूलररोड, जिजामाता महाविद्यालयाजवळ, बुलढाणा या कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे, असे गृहपाल शासकीय आदीवासी मुलींचे शासकीय वसतिगृह बुलढाणा यांनी कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या