हसूल विभागाच्या सेवांसाठी आता 'सुलभ सेवा' व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना
महसूल
विभागाच्या सेवांसाठी आता 'सुलभ सेवा' व्हॉट्सॲप चॅटबॉट
जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील
यांची संकल्पना
बुलढाणा,
दि.26 : महसूल विभागाच्या सेवा सामान्य
नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या
संकल्पनेतून 'सुलभ सेवा' या नावाने एक व्हॉट्सअॅप चॅटवॉट सुरू करण्यात आले आहे. हे
चॅटबॉट राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रम ई-गव्हर्नन्सअंतर्गत विकसित
करण्यात आले आहे.
याद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना तहसील कार्यालय, उपविभागीय
अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणाऱ्या विविध सेवांची माहिती तसेच
त्या सेवांसाठी अर्ज करण्याची सोय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. 'सुलभ
सेवा' या चॅटबॉटमध्ये विविध प्रमाणपत्र उदा. उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर
दाखला, इत्यादी दाखले तसेच 'जिवंत सातबारा' मोहीम आणि 'सलोखा’ योजना यांसारख्या सेवांबद्दल
सविस्तर माहिती दिलेली आहे, ज्यात आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यांचा समावेश
आहे. त्यामुळे, नागरिकांना सरकारी कार्यालयात न जाता, घरबसल्या आवश्यक माहिती मिळवणे
आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करणे सोपे झाले आहे.
'सुलभ
सेवा' चॅटबॉटद्वारे मिळणारी माहितीः
महसूल
विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय
यांद्वारे मिळणाऱ्या विविध सेवांची सविस्तर माहिती मिळते.
प्रत्येक
सेवेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी मिळते.
विशिष्ट
सेवेसाठी कोणत्या कार्यालयात उदा. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय,
तहसीलदार कार्यालय किंवा कोणत्या संकेतस्थळावर अर्ज करावा, याची माहिती मिळते.
'सुलभ
सेवा' चॅटबॉटचा उद्देशः
या
चॅटबॉटचा मुख्य उद्देश शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचवणे, त्यांना
योग्य आणि अचूक माहिती वेळेवर उपलब्ध करून देणे, तसेच प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक
आणि गतिमान करणे हा आहे. कोणतीही सेवा घेण्यापूर्वी नागरिकांना आवश्यक ती सर्व माहिती
एका क्लिकवर, नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळेल.
'सुलभ
सेवा' चॅटबॉटचा वापर कसा कराल?
हा
चॅटबॉट वापरण्यास अत्यंत सोपा आहे. नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा +91
94231 84804 हा व्हॉट्सअॅप क्रमांक 'सुलभ सेवा' या नावाने सेव करून त्यावर 'Hi' असा
संदेश पाठवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या 'सुलभ सेवा' व्हॉट्सअॅप
चॅटबॉटचा अधिकाधिक वापर करून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.
किरण पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment