चिखली तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांची आरक्षण सोडत 9 जुलैला*
चिखली तालुक्यातील
99 ग्रामपंचायतींसाठी
सरपंच पदांची
आरक्षण सोडत 9 जुलैला*
बुलढाणा, दि. 27 (जिमाका): चिखली
तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत होणाऱ्या ९९ ग्रामपंचायतींतील सरपंच पदासाठी
आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा
कार्यक्रम दि. ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय, चिखली येथे उपविभागीय अधिकारी,
बुलडाणा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील स्त्रिया व इतर प्रवर्गासाठी
आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
या
सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमधील आरक्षण निश्चित होणार असून, नागरिकांनी
या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच या सोडतीच्या कार्यक्रमासाठी सर्व राजकीय
पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहावे, असे आवाहन तहसिलदार, चिखली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment