बुलढाण्यात उद्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

बुलढाण्यात उद्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा आणि जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवारी दि.26 जून रोजी जिजामाता महाविद्यालय,बुलढाणा येथे करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स् बॅक, बुलढाणा, सहयोग क्रेडीट कॉपरेटीव्ह सोसायटी, बुराड अॅग्रो फुड, बुलढाणा क्रेडीट आक्सेस ग्रामीण कोटा, बुलढाणा, हेंड सुझुकी, बुलढाणा व जय हिंद प्रा.पुणे या सारख्या नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

१० वी, १२ वी, आय टी आय पदवीधर पुरुष महिला उमेदवारांनी दि.२६ जून रोजी जिजामाता महाविद्यालय बुलढाणा जि. बुलढाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

पात्र, गरजू व नौकरी इच्छुक उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता सुध्दा मुलाखत देऊ शकतात, तरी दि.२६ जून रोजी जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्याच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे

याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (०७२६२-२४२३४२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या