चिखली येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
चिखली येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि.
25 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभाग, बुलडाणा यांच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिखली येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
या प्रवेश
प्रक्रियेमध्ये अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, इतर
मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग तसेच अनाथ विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार प्रवेशासाठी पात्रता आहे.प्रवेशासाठी नगर
परिषद चिखली हद्दीतील शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत प्रथम वर्षात प्रवेश
घेतलेले विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी वसतिगृहात
जमा करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक
माहितीसाठी वसतिगृह
प्रभारी गृहपाल विनोद शिंदे यांच्याशी क्रमांक: 9850464364 वर संपर्क साधावा.
सर्व पात्र
विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वसतिगृह प्रशासनाच्यावतीने करण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment