बुलडाणा येथील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 बुलडाणा येथील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा,दि. 30 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृह, बुलडाणा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसतीगृहात उपलब्ध असलेल्या रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावेत. अर्ज भरल्यानंतर तो पोर्टलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन संबंधित वसतीगृह कार्यालयात ऑफलाईन सादर करणे आवश्यक आहे.

या प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालयीन, बिगर व्यवसायिक तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल एस. ई. गारमोडे यांनी केले आहे.

0000.

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या