Posts

Showing posts from June, 2025

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता मिळणार शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता मिळणार शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन बुलढाणा,दि.३० : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचा लाभ जुलै, २०२५ मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ हजार ३९६ शेतकऱ्यांची ई केवायसी आणि ४ हजार ५३४ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हण...

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य 3,90,123 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार

  कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य 3,90,123 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार बुलडाणा, दि. 30 (जिमाका): कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी ओळख क्रमांक दि. 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतकरी ओळख क्रमांक बनवलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा ग्राम कृषी विकास समितीकडे जाऊन नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत एकूण 4,34,468 लाभार्थी असून, त्यापैकी 2,99,968 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढले आहेत. शेतकरी ओळख क्रमांकाचे महत्त्व काय? शेतकरी ओळख क्रमांक अंतर्गत कृषी व संलग्न विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेताची, आधार क्रमांकाशी संलग्न अशी माहिती एकत्र करून "फार्मर रजिस्ट्री" तयार करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची अचूक निवड करून कृषी योजनांचा लाभ अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने वि...

जिल्ह्यात आज 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' 25 हजार नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

  जिल्ह्यात आज 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' 25 हजार नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट बुलढाणा,दि. 30 (जिमाका) : केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाच्या निर्देशानुसार 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान 'वित्तीय समावेशन मोहीम' जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 1 जुलै रोजी 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. समाजातील वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये सामावून घेणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार या दिवशी जिल्ह्यातील 25 नागरिकांचे अटल पेन्शन योजनेंअंतर्गत नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँक शाखांना प्रत्येकी 100 अटल पेन्शन योजना नोंदणीचे उद्दिष्ट, तर सर्व बँकिंग प्रतिनिधींना प्रत्येकी 25 नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अटल पेन्शन योजना ही केंद्र शासनाची योजना असून, 18 ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. या योजनेअंतर्गत नियमित मासिक प्रीमियम भरल्यास वयाची 60 वर्...

बुलडाणा येथील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

  बुलडाणा येथील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन बुलढाणा,दि. 30 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृह, बुलडाणा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसतीगृहात उपलब्ध असलेल्या रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावेत. अर्ज भरल्यानंतर तो पोर्टलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन संबंधित वसतीगृह कार्यालयात ऑफलाईन सादर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालयीन, बिगर व्यवसायिक तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल एस. ई. गारमोडे यांनी केले आहे. 0000 .

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्या ; जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन

  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्या ; जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन बुलढाणा,दि. 30 (जिमाका) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 करिता या योजनांअंतर्गत अनुक्रमे 90 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून, एकूण 45 लाख रुपये अनुदान तर बीजभांडवल योजनेसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याची तरतूद असून त्यापैकी 25 हजार रुपये इतके थेट अनुदान देण्यात येते. बीजभांडवल योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते.  त्यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान व नियमानुसार ब...

चिखली तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांची आरक्षण सोडत 9 जुलैला*

  चिखली तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांची आरक्षण सोडत 9 जुलैला* बुलढाणा, दि. 27 (जिमाका): चिखली तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत होणाऱ्या ९९ ग्रामपंचायतींतील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय, चिखली येथे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील स्त्रिया व इतर प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमधील आरक्षण निश्चित होणार असून, नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच या सोडतीच्या कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार, चिखली यांच्यावतीने करण्यात आले आहे. 00000

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकासासाठी ७ लाखांचे अनुदान ! अनुदानित शाळा, क्रीडा संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत क्रीडांगण विकासासाठी ७ लाखांचे अनुदान ! अनुदानित शाळा, क्रीडा संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 27 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा मार्फत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सन २०२५-२६ करिता क्रीडांगण विकासासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती वस्तीत असलेल्या शासकीय व अनुदानित शाळा, क्रीडा संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना विविध कामांसाठी अधिकतम रुपये ७ लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात येणार आहे: ही कामे करता येतात : क्रीडांगण समपातळीत करणे, २०० मीटर/४०० मीटर धावपट्टी तयार करणे, कंपाऊंड भिंत/तार घालणे, प्रमाणित मैदान निर्मिती, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी व भांडारगृह उभारणी, फ्लडलाईट सुविधा, क्रीडा साहित्य खरेदी, प्रेक्षक गॅलरी व शेड बांधकाम, ड्रेनेज व स्प्रिंकलर यंत्रणा अटी व आवश्यक कागदपत्रे: अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांची जमीन ही अनुसूचित जाती वस्तीत असणे अनिवार्य असून, प्रस्तावासोबत गटविकास अधिका...

खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा ५० हजारांपर्यंतचे बक्षीस कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

  खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा ५० हजारांपर्यंतचे बक्षीस कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन बुलडाणा, दि. 27 (जिमाका): राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, तसेच उत्पादनक्षम शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2025 करिता पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. डी. ढगे यांनी केले आहे. या योजनेचा उद्देश प्रयोगशील शेतकऱ्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळवून देणे आहे. विजेत्या शेतकऱ्यांचे मनोबल वाढून आधुनिक शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल, यामुळे एकूणच जिल्ह्याचे व राज्याचे उत्पादन वाढण्यास हातभार लागेल. यामध्ये समाविष्ट असलेली पिके: मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, भुईमुग व सूर्यफूल. आवश्यक पात्रता: शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी व तो ती स्वतः कसत असावा,एकाचवेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येतो,स्पर्धेसाठी निवडलेल्या पिकाखाली किमान ४० आर क्ष...

बुलढाण्यात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा समता दिंडी, जनजागृती रॅलीद्वारे समतेचा दिला संदेश

  बुलढाण्यात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा समता दिंडी, जनजागृती रॅलीद्वारे समतेचा दिला संदेश बुलढाणा, दि.27 जिमाका: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 26 जून हा दिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून बुलढाणा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दिवशी सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद कार्यालय येथून समता दिंडी व जनजागृती रॅलीचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड आणि जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी मनोज मेरत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या रॅलीचे समारोप देखील जिल्हा परिषद कार्यालय येथे झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने नशामुक्ती विषयक चित्रप्रदर्शन स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, छत्रपती शाहू महाराज व इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्ती शपथवाचनाने झाली. प्रास्ताविक डॉ. अनिता राठोड यांनी करताना शाहू महाराजांच्या नावाने राबविण्य...

शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा उत्साहात

Image
  शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा उत्साहात बुलढाणा, दि.२७ जिमाका: कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची २९ वी सभा मौजे मुरादपूर येथील शेतकरी रामेश्वर इंगळे यांच्या शेतात मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान विष्णूभाऊ गाडेकर यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे,  कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, विशेषज्ञ डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, डॉ. जगदीश वाडकर, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष विजय भुतेकर, स्वप्नील महाजन उपस्थित होते. या वेळी डॉ. अमोल झापे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची संकल्पना व उद्दिष्ट स्पष्ट करताना, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामागील उद्देश अधोरेखित केला. त्यांनी खरीप पिकासाठी उपयुक्त अशा कृषी निविष्ठांबाबतही माहिती दिली. डॉ. दिनेश कानवडे यांनी खरीप पीक लागवडीच्या नव्या तंत्रज्ञानांवर सखोल मार्गदर्शन करताना मका पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भातही महत्वपूर्ण माहिती दिली. तर स्वप्नील महाजन यांनी ‘शून्...

बुलढाण्यात उद्योजकांसाठी 'सस्टेनेबिलिटी', ' व्यवसाय सुलभता' व नियम शिथिलीकरण' विषयांवर कार्यशाळा संपन्न

Image
  बुलढाण्यात उद्योजकांसाठी 'सस्टेनेबिलिटी', ' व्यवसाय सुलभता' व नियम शिथिलीकरण' विषयांवर कार्यशाळा संपन्न   बुलढाणा,दि. 27 : जिल्ह्यातील उद्योजकांसाठी 'सस्टेनेबिलिटी', 'व्यवसाय सुलभता' तसेच डी रेग्युलेशन नियम शिथिलीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर एकदिवसीय कार्यशाळा येथील नर्मदा हॅाटेलच्या सभागृहात गुरुवारी यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, पुणे यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील ६० उद्योजकांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेचे उद्घाटन सत्र अत्यंत माहितीपूर्ण ठरले. पुणे येथील राईस एन्टरप्रासेस चे प्रकल्प प्रमुख योगेश जोशी यांनी 'सस्टेनेबिलिटी' (शाश्वतता) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ऊर्जा संवर्धन, अक्षय ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा, तसेच हरित ऊर्जा व हरितगृह वायू या संकल्पना स्पष्ट केल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी कचरा व्यवस्थापन, प्रदूषण आणि लीन मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून शाश्वतता कशी साध्य करता येते, यावर भर दिला. उद्योगाच्या बजेटिंगच्या महत्त्वावरही त्यांनी प्...

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

  बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि. 13 व 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दि. 17 जून 2025 रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार बुलडाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे आरक्षण सोडत 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा निवडणूक इमारत, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे. या सभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासोबतच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्ग महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे. 0000  

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज आमंत्रित

  राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज आमंत्रित   बुलडाणा, दि. 26 : सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या शासन निर्णयान्वये राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी   या चालू आर्थिक वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी केले आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या साहित्यिक व कलावंतांनी https://mahakalasanman.org/ pgeApplicationFromForUser.aspx या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून दोन प्रतीमध्ये संपूर्ण प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह तालुका निहाय गट विकास अधिकारी, पंचायत समितीकडे दिनांक 31 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. या योजनेचे नियम व अटी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या क्रमांक दि. 2 जून 2025 पत्रामध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेले आहेत. अर्ज करताना अर्जदारांनी या नियम व अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. फक्त नियम व अटींची पूर्तता करणारे आणि आवश्य...

हसूल विभागाच्या सेवांसाठी आता 'सुलभ सेवा' व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना

  महसूल विभागाच्या सेवांसाठी आता 'सुलभ सेवा' व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना बुलढाणा, दि.26 : महसूल विभागाच्या सेवा सामान्य नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून 'सुलभ सेवा' या नावाने एक व्हॉट्सअॅप चॅटवॉट सुरू करण्यात आले आहे. हे चॅटबॉट राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रम ई-गव्हर्नन्सअंतर्गत विकसित करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणाऱ्या विविध सेवांची माहिती तसेच त्या सेवांसाठी अर्ज करण्याची सोय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. 'सुलभ सेवा' या चॅटबॉटमध्ये विविध प्रमाणपत्र उदा. उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर दाखला, इत्यादी दाखले तसेच 'जिवंत सातबारा' मोहीम आणि 'सलोखा’ योजना यांसारख्या सेवांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, ज्यात आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यांचा समावेश आहे. त्यामुळे, नागरिकांना सरकारी कार्यालयात न जाता, घरबसल्या आवश...

चिखली येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

  चिखली   येथील   मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात   प्रवेश सुरु पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन बुलढाणा, दि. 25 (जिमाका):   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा यांच्या अधिनस्त   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिखली   येथे शैक्षणिक वर्ष   2025-26   करिता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये   अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग तसेच अनाथ विद्यार्थ्यांना   आरक्षणाच्या टक्केवारीनुसार प्रवेशासाठी पात्रता आहे. प्रवेशासाठी   नगर परिषद चिखली हद्दीतील शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज   ऑनलाईन पद्धतीने   स्वीकारण्यात येतील. विद्यार्थ्यांनी   http://hmas.mahait.org   या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.   अर्ज भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी वसतिगृहात जम...

26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा

  26 व 27 जून रोजी जिल्हा दक्षता समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा बुलढाणा, दि. 25 (जिमाका): भ्रष्टाचार निर्मूलन व प्रशासनातील पारदर्शकतेसाठी शासन परिपत्रकान्वये गठीत आणि जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि. 26 व दि. 27 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 26 जून 2025 रोजी दुपारी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडणार आहे. तर, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि. 27 जून 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सभागृहात होणार आहे. जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी ज्या व्यक्तींना तक्रारी सादर करावयाच्या असतील, त्यांनी स्पष्ट शब्दांत व सबळ पुराव्यांसह प्रतिज्ञापत्रावर तक्रारी दाखल कराव्यात , असे आवाहन करण्यात आले आहे. समिती समोर उपस्थित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व पुराव्यांसह तक्रारी पूर्वतयारीनिशी सादर कराव्यात, जेणेकरून भ्रष्टाचारविरोधी लढ्यात ठोस निर्णय घेता येतील. जिल्ह्यातील नागरिकांनी या समित्यांच्या माध्यमा...

एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक ; बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक

Image
  एशिया कप सिंगापूर स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाला रौप्य पदक ; बुलढाण्याच्या मिहिर अपार याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक   बुलढाणा,दि.25 : सिंगापूर येथे दि.15 ते 20 जून दरम्यान एशिया कप स्टेज टू तिरंदाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारतीय संघाला रौप्य पदक मिळाले असून या संधात सहभागी असलेल्या बुलढाण्याचा तिरंदाज मिहीर नितीन अपार याने जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली.   भारतीय संघामध्ये बुलढाण्याचा तिरंदाज मिहीर नितीन अपार हरियाणाचा कुशल दलाल व आंध्र प्रदेशचा गणेश मनीरत्नम यांचा समावेश होता. मिहीर अपार याने यापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कॅनडासाठी सुद्धा मिहीर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिहीरच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत असून जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनीही यावेळी कौतूक करुन शुभेच्छा दिल्या. मिहीरने आपल्या या यशाचे श्रेय कोच चंद्रकांत सलग आणि त्यांच्या आई-वडिलांना दिले आहे. ००००