बुधवारी भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठकीचे आयोजन

 

बुधवारी भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठकीचे आयोजन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या  अध्यक्षतेखाली बुधवार दि. 26 मार्च 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच जिल्हा दक्षता समितीची सभा अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 26 मार्च 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता अपर जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात होणार आहे. तरी ज्या व्यक्तींना भ्रष्टाचार निर्मूलन समिती सभेत आपल्या तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञालेखावर तक्रारी स्पष्ट शब्दांत आणि सबळ पुराव्यासह समितीसमोर सादर करावे, असे आवाहन तहसिलदार यांनी प्रसिद्धीपत्राव्दारे केली आहे.   0000000

 

Comments

  1. सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा येथील तहसीलदार श्री अजित दिवटे यांनी आर्थिक देवाणघेवाण करुन हितसंबंध जपत चुकीचे जमीन वाटप नोंद केली आहे. एकाच महसूल केस प्रकरणात बुट्टा तालुका सिंदखेडराजा येथील बालु चाफा पवार,भिमा शामा चव्हाण व सुका शामा चव्हाण या तिघांना समसमान क्षेत्र भाडे पट्टा ९.३४ आर एकाच वेळी मिळाले आहे.पण आज रोजी निव्वळ आर्थिक देवाणघेवाण करुन या पैकी एकाला १८ एकर तर एकाला दोनच एकर अशी नोंद ठेवली आहे. वरिष्ठ न्यायालयात न्याय निवाडे होऊन सुद्धा ते यांनी रद्द केले आहे.कर्करोगाने मयत विधवा पत्नी लेकरं कंपनी करुन पोट भरत आहे,या सदर तहसीलदार यांनी त्यांच्या जमिनी, लेकरांच्या तोंडचा घास चोरुन चुकीचे लोकांना दिला आहे.उपविभागिय अधिकारी, मागील तहसीलदार यांनी सुस्पष्ट आदेश दिले.न्याय दिला.मूळ भाडे पट्टा,प्रत्यक्ष मिळाले ते सर्वे नंबर गट नंबर यांचा तपासणी छाणनी करुन आदेश दिले पण या तहसीलदार यांनी निव्वळ पैसे घेऊन कोणतीही सत्यता वास्तव न करता चुकीचे आदेश नोंद केली आहे.त्यांच्या या प्रमादाची गंभीर दखल घ्यावी हि विनंती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या