खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बुलडाणा, दि. 26 (जिमाका):  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील राहेरी बु. गावाजवळील खडकपुर्णा नदीच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता खडकपुर्णा नदीच्या पुलावरील काम पुर्ण होईपर्यंत जडवाहणाची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना-सिंदखेडराजा-किनगांवराजा-सुलतानपुर-मेहकर-मालेगांव या मार्गावरील वाहतूक जालना-देऊळगांवराजा-चिखली-मेहकर-मालेगांव या पर्यायी मार्गाने. तसेच मालेगांव-मेहकर-सुलतानपूर-किनगांवराजा-सिंदखेडराजा-जालना या मार्गावरील वाहतुक मालेगांव-मेहकर-चिखली-देऊळगावंराजा-जालना या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येईल. 00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या