पी.एम.किसान "एपीके" लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी; फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा
पी.एम.किसान
"एपीके" लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी;
फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत
शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप एपीके मॅसेजची लिंक
उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत असल्याचे निर्देशनात आले
आहे. शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान एपीके ॲप्लीकेशन व लिंकपासून सावध राहावे, असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके लिंक किंवा
पीएम किसान एपीके संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू
नये. त्याऐवजी केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या अधिकृत https://pmkisan.gov.in/ या पोर्टलचा वापर
करावा. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित
जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी श्री. ढगे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment