पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ
चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर
बुलडाणा,
(जिमाका) दि. 28 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात
घेता चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.
यामध्ये भालगाव व कोलारा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या
जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
भालगाव येथे 1 हजार 620 पशुधन व 3 हजार 273 लोकसंख्येसाठी
एक टॅंकर 96 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. कोलारा गावाला 4 हजार पशुधन व
4 हजार 856 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 76 हजार 660 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे
पुरवठा करेल.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात
घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या
खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी
यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून
द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment