चिखली तालुक्यातील वळती गावांतून फार्मर आयडी याजेनाचा शुभारंभ;
चिखली तालुक्यातील
वळती गावांतून फार्मर आयडी याजेनाचा शुभारंभ;
शेतकऱ्यांनी योजनाचा लाभ
घ्यावा- तहसिलदार
बुलडाणा,
(जिमाका) दि. 4 : शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने
पोहचविण्यासाठी केंद्र शासनाने
शेतकऱ्यांसाठी आधार कार्डप्रमाणे स्वतंत्र डिजीटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला
आहे. या योजनेचा शुभारंभ चिखली तालुक्यातील वळती गावापासून तहसीलदार संतोष काकडे
यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी डिजीटल फार्मर आयडी तयार
करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
योजनेंतर्गत शेतकरी यांना
विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महसूल, कृषी व सीएससी केंद्रामार्फत शेतकरी
व त्यांच्या शेताचे आधार सलंग्न माहिती संच तयार करण्याचे काम सुरु आहे. चिखली
तहसीलदार संतोष काकडे यांनी चिखली तालुक्यातील 11 मंडळात ॲग्रीस्टकच्या शिबीराला उपस्थित
राहून योजनेचे महत्व लोकांना विषद केले. तसेच फार्मर आयडी तयार करण्यासाठी ग्राम
महसूल अधिकारी, कृषीसहायक व सीएससी केंद्रांना भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्या सीएससी केंद्रावर फार्मर आयडी तयार करण्यास हयगय होत असल्याचे निर्देशात
आल्यास अशा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा सूचना श्री. काकडे यांनी दिल्या.
00000
Comments
Post a Comment