अभियांत्रिक व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अर्ज आमंत्रित; > अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षेव्दारे होणार निवड
अभियांत्रिक व वैद्यकीय
प्रवेश परीक्षांसाठी अर्ज आमंत्रित;
> अनुसूचित जमातीच्या
40 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षेव्दारे होणार निवड
बुलडाणा, दि. 27 (जिमाका): आदिवासी विकास विभागातंर्गत बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये
शिकत असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश(NEET,
CET/JEE) परीक्षेच्या तयारीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. प्रत्येकी 40 विद्यार्थ्यांची
चाळणी परिक्षेद्वारे निवड केली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 9 एप्रिल
2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी
मोहनकुमार ग.व्यवहारे यांनी केले.
सर्व शासनमान्यता प्राप्त शासकीय,
अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आदिवासी विकास विभागातंर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित
आश्रमशाळा, इएमआरएस शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील मार्च 2025 मध्ये इयत्ता
10 वीची परिक्षा दिलेल्या व शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 9 वी मधिल गुणानुक्रमे प्रथम पाच मुले व पाच मुली यांचे आवेदनपत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, न्यू. राधिकिसन प्लॉट, महसूल भवन अकोला येथे दि. 9 एप्रिलपर्यंत
सादर करावयाचे आहे. सदर आवेदनपत्र जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), शासकीय,
अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी
चाळणी परिक्षेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment