पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर
पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका)
दि. 7 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील
चार गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये हिवरा
साबळे, पारडी, वरवंड व जवळा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा
केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी यांनी दिली.
हिवरा साबळे गावाला
335 पशुधन व 1810 लोकसंख्येसाठी एक टॅकर 44 हजार 660 लिटर्स पाणी पुरवठा करणार
आहेत. पारडी गावाला 635 पशुधन व 1350 लोकसंख्येसाठी एक टॅकर 36 हजार 50 लिटर्स
पाणी, वरवंड गावाला 1200 पशुधन व 2850 लोकसंख्येसाठी एक टॅकर 85 हजार लिटर्स पाणी
व जवळा गावाला 712 पशुधन व 1464 लोकसंख्येसाठी एक टॅकर 53 हजार 760 लिटर्स पाणी पुरवठा
करेल.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या चार गावांसाठी
पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची
ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी
करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून
द्यावे, असे उपविभागीय अधिकारी मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment