तहसिल कार्यालयात 19 मार्चला जागतिक ग्राहक दिन
तहसिल कार्यालयात 19 मार्चला जागतिक ग्राहक
दिन
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : जिल्हा पुरवठा
कार्यालय व तहसिल कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन साजरा
केला जाणार असून यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. किरण
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय,
बुलढाणा येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी शरद पाटील,
जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे, तहसीलदार व्ही.एस. कुमरे आणि निरीक्षण अधिकारी
निलीमा उरकुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्राहकांच्या हक्कांबाबत जागरूकता
निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
करण्यात आले आहे. 000000
Comments
Post a Comment