मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने
मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून
त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने
एवढा निश्चित करण्यात आलेला होता. तथापि दि. 10 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार
उमेदवारांचा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच महिन्यांनी वाढविण्यात आला असून आता
एकूण 11 महिने करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शासकिय, निम शासकीय
कार्यालय, खाजगी आस्थापना, महामंडळे तसेच विविध आस्थापनेमध्ये सहा महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा प्रशिक्षणार्थी
यांनी पुढील पाच महिन्याच्या कार्यप्रशिक्षण कालावधी त्यांच्या संबंधित आस्थापनेवर
दि. 30 एप्रिल, 2025 च्या आधी रुजू व्हावे. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा
रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय
असेल. ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा प्रशिक्षणार्थींची नोंदणी करणे आवश्यक राहिल, यांची नोंद
घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment