आयटीआय देऊळगाव राजा येथे निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

 

आयटीआय देऊळगाव राजा येथे निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

बुलडाणा, दि. 20 (जिमाका):  संत चोखामेळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा येथे वापरून निकामी, निरुपयोगी व कालबाह्य यंत्रसामुग्री, हत्यारे व अवजारे इत्यादी निर्लेखित करण्यात आली असून, त्याच्या विक्रीसाठी सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.

 

या साहित्याची यादी तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी 18 मार्चपासून कार्यालयीन वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेसाठी इच्छुकांनी बुधवार दि. 26 मार्च  रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सीलबंद निविदा कार्यालयीन वेळेत निविदा पेटीत टाकावी. यानंतर आलेल्या निविदा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.  साहित्याची संख्या कमी-अधिक करण्याचा अथवा निविदा नाकारण्याचा पूर्ण अधिकार प्राचार्यांना राहील.

 

निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्ती कार्यालयात उपलब्ध असून, इच्छुकांनी 100 रुपये रोख भरून निविदा अर्ज प्राप्त करुन विहित मुदतीत निविदा सादर करण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या