शेगांव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा
शेगांव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर व सिद्धिविनायक टेक्निकल, शेंगाव यांच्या
संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 7 मार्च 2025 रोजी शेगांव येथे रोजगार मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा इच्छुक पात्रकाधारक उमेदवारांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
संचालक गणेश बिटोडे यांनी केले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता विभाग आणि केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत नॅशनल
करियर सर्विसच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार
मेळाव्यात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये भास्कर
सर्विसेस टॅलेंट सेतु पुणे, वन एशिया खामगाव, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कूटा यासारख्या नऊपेक्षा
अधिक नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील 470 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित
केलेली आहे. मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजु व रोजगार इच्छुक
उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.
कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://mahaswayam.gov.in व श्रम आणि रोजगार मंत्रालय
भरात सरकार अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरच्या https://www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी असलेल्या अथवा नसलेल्या
10 वी, 12 वी, आय टी आय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांनी शुक्रवार दि. 7 मार्च रोजी
सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभागी होऊन
रोजगारांची संधी उपलब्ध करून घ्यावी. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता
कार्यालयात येण्याची गरज नाही.
रोजगार मेळाव्यात पात्र,गरजु
व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा
जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. तरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या
कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहुन आपले नाव नोंदणी करावे. अधिक
माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी 07262-242342 या क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment