बुलढाण्यात विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा > २३ मार्चला सहकार विद्या मंदीर येथे आयोजन > ५० हून अधिक शासकीय विभागांचे स्टॉल्स

 

बुलढाण्यात विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

 

> २३ मार्चला सहकार विद्या मंदीर येथे आयोजन

> ५० हून अधिक शासकीय विभागांचे स्टॉल्स

 

बुलडाणा, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यातील नागरिकांना कायदेशीर सेवा, शासकीय योजना व त्याच्या लाभाविषयी माहिती देण्यासाठी रविवार, दि. २३ मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता सहकार विद्या मंदीर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यात ५० हून अधिक शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार असून, नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती तसेच लाभ दिले जाणार आहे.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

महामेळाव्याचा उद्घाटन समारंभ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल स. किलोर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष मंजुषा व. देशपांडे राहणार आहे.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व प्र. पानसरे आणि जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या महाशिबीरात विविध शासकीय योजना, कायदेशीर सेवा आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या