800 ज्येष्ठ नागरिकांचे अयोध्या तीर्थदर्शन · मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

 

800 ज्येष्ठ नागरिकांचे अयोध्या तीर्थदर्शन

·         मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना  

 

बुलडाणा, दि. 20 (जिमाका): मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिकांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम मंदीर या  तीर्थस्थळाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव आणि समाज कल्याण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आले असून लाभार्थ्यांना नेआण करण्यासाठी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान या कालवधीत हे तीर्थदर्शन पार पडले.

 

यात्रेच्या प्रारंभी दि. 7 मार्च  रोजी मलकापूर रेल्वे स्थानकावर केंद्रीय  राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तसेच पालकमंत्री, मकरंद जाधव पाटील, यांनी भ्रमणध्वनीद्वारे सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर आमदारानी देखील यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील  यांनी स्वतः मलकापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून सर्व लाभार्थ्यांना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

 

या यात्रेदरम्यान लाभार्थ्यांच्या सोबत समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि नर्स उपस्थित होत्या. त्यामुळे यात्रा अधिक सुरक्षित आणि सुखद झाली.

यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर आनंद

दि. 11 मार्च  रोजी सर्व लाभार्थी सुखरूप आपल्या गावी परतले. यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. अयोध्या तीर्थदर्शनामुळे त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत शासनाने आयोजित केलेल्या या यात्रेमुळे  ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करुन शासनाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. 0000000

 

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी