बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व मार्गदर्शन सत्र > नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी > थेट मुलाखतीने निवड > विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी मार्गदर्शन मिळणार
बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व
मार्गदर्शन सत्र
> नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी
> थेट मुलाखतीने निवड
> विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी
मार्गदर्शन मिळणार
बुलडाणा, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार
मंत्रालयाच्या नॅशनल करियर सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन
सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी दि.२१ मार्च रोजी पंकज लद्दड
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज, येळगाव, बुलढाणा येथे होणार आहे.
या मेळाव्यात जस्ट डायल लिमिटेड, पुणे; भारस्कर सर्विसेस, पुणे; टॅलेंट सेतु,
पुणे; स्वतंत्र मायक्रो फायनान्स; क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कूटा यांसारख्या ८ पेक्षा
अधिक नामांकित कंपन्यांनी ४७० पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केलेली आहे. या मेळाव्यात
उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड केली जाईल. तसेच, केंद्र शासनाच्या
पीएम इंटर्नशिप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सहभागातून इस्राइलमध्ये उपलब्ध रोजगार
संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या
https://mahaswayam.gov.in व श्रम आणि रोजगार मंत्रालय भरात सरकार अंतर्गत मॉडेल करीयर
सेंटरच्या https://www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी असलेल्या अथवा नसलेल्या
१० वी, १२ वी, आय टी आय, पदवीधर पुरुष / महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी
प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून घ्यावी.
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही.
तसेच या रोजगार मेळाव्यात पात्र, गरजु व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या
शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. अर्जदारांनी
आवश्यक त्या कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित
कंपन्यांच्या प्रतिनीधीसमवेत मुलाखत द्यावी.
बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत
काही अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी 07262242342 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करीयर
सेंटर बुलढाणाचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
Job Fair and Guidance Session in Buldhana on Friday
> Job Opportunities in Reputed Companies
> Direct Selection Through Interviews
> Guidance on Overseas Employment and PM Internship Scheme
Buldhana, March 19: To provide job opportunities for educated unemployed
candidates in the district, the Department of Skill Development, Employment,
Entrepreneurship, and Innovation, along with the Ministry of Labour and
Employment’s National Career Service, is organizing a job fair and guidance
session. This event will take place on Friday, March 21 at Pankaj Laddad
Institute of Technology and Management Studies, Yelgaon, Buldhana.
More than 470 vacancies have been announced by over eight reputed
companies participating in the fair, including Just Dial Limited, Pune;
Bharskar Services, Pune; Talent Setu, Pune; Swatantra Microfinance; and Credit
Access Grameen Koota. Candidates will be selected through direct interviews conducted
at the venue. Additionally, guidance will be provided on employment
opportunities in Israel through the Maharashtra government’s partnership and
the PM Internship Scheme under the Central Government.
Who Can Participate:
Male and female candidates who have completed 10th, 12th, ITI, or
graduation (whether registered or not) on the Maharashtra Skill Development
Department's website https://mahaswayam.gov.in or the Ministry of Labour and
Employment's National Career Service website https://www.ncs.gov.in are
eligible to participate.
Candidates are advised to attend the job fair in person to seize this
employment opportunity. There is no need to visit the office to register for
the event.
Additional Information:
Eligible and interested male and female candidates can apply for more
than one position based on their qualifications. Candidates should attend the
job fair at their own expense, carrying all necessary documents for
registration and interviews with company representatives.
The District Skill Development, Employment, and Entrepreneurship Guidance
Centre and Model Career Centre, Buldhana, urge maximum participation from local
candidates. For any queries or assistance, candidates can contact the office at
07262242342, said G.P. Bitode, Assistant Commissioner, District Skill
Development, Employment, and Entrepreneurship Guidance Centre, Buldhana.
0000
Comments
Post a Comment