कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत नोंदणी करावी
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत नोंदणी करावी
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : भारतीय कापूस निगमच्या शासकीय कापूस खरेदी योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.15 मार्च पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, चालू हंगाम 2024-25 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मध्ये किमान आधारभूत किमंतीवर (एमएसपी) कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आगाऊ किंवा जागेवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 15 मार्च पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. 000000
Comments
Post a Comment