पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

 

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील पाच  गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये ढासाळवाडी, सैलानी, पिंपळगाव सराई, चौथा व पिंपरखेड या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

  ढासाळवाडी गावाला 2050 पशुधन व 254 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 86 हजार 880 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. सैलानी गावाला 150 पशुधन व 1008 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 24 हजार 660 लिटर्स पाणी, पिंपळगाव सराई गावाला 592 पशुधन व 5592 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 19 हजार 600 लिटर्स पाणी, चौथा गावाला 430 पशुधन व 1678 लोकसंख्येसाठी एक टँकर 72 हजार 100 लिटर्स व पिंपरखेड गावाला 450 पशुधन व 800 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 21 हजार 500 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या