उन्हाळी भुईमुगावर बुरशीचा धोका; शेतकऱ्यांनो आधीच घ्या काळजी! कृषी विभागाचे आवाहन
उन्हाळी भुईमुगावर बुरशीचा धोका; शेतकऱ्यांनो आधीच घ्या काळजी!
कृषी विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात मोठ्या
प्रमाणावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली असून, काही ठिकाणी पीक बहरत आहे. मात्र, हवामानातील
बदल, जमिनीत जास्त ओलावा आणि तापमानातील चढ-उतार यामुळे भुईमुगावर बुरशीजन्य रोगांचा
संभाव्य धोका वाढला आहे. त्यामुळे पांढरी बुरशी, मूळकूज आणि खोडकूज होण्याची शक्यता
असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
भुईमुग पिकातील सद्यस्थिती:
प्रस्तावित पेरणी क्षेत्र: 4,770
हेक्टर
आतापर्यंत पेरणी झालेलं क्षेत्र:
3,446 हेक्टर
बुरशीजन्य रोगांची लक्षणे:
सुरुवातीला झाडांची पाने फिकट पिवळी
पडू लागतात. त्यानंतर झाड हळूहळू सुकू लागते आणि उत्पादनावर परिणाम होतो. जमिनीत जास्त
ओलावा राहिल्यास मूळ आणि खोड कुजण्याचा धोका वाढतो.
बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक
उपाय:
बीज प्रक्रिया: रोग प्रतिबंधात्मक
उपाययोजना करतांना ट्रायकोडर्मा व्हिरीडी (4 ग्रॅम/प्रति किलो बियाणे), कार्बोझीन
37.5% + थायरम 37.5% डब्ल्यु पी किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% पी (3 ग्रॅम/प्रति
किलो बियाणे) या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
मातीची योग्य निगा: पेरणीपूर्वी रायझोबियम
आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी 250 ग्रॅम प्रमाणात 10-15 किलो बियाण्यास
लावावे.
जमिनीची योग्य निगा ठेवा : पेरणी
करतांना चांगला निचरा होईल याची खात्री करा. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास मूळकूज
आणि खोडकूज वाढू शकते. त्यामुळे जास्त पाणी टाळा.
पिकाचे
नियमित निरीक्षण:
झाडांची पाने पिवळी पडतात का, खोडाजवळ
पांढरी बुरशी दिसते का याकडे लक्ष द्या. झाडांची वाढ कमी होत असल्यास त्वरित कृषी तज्ज्ञांचा
सल्ला घ्या. भुईमुगावर सध्या बुरशीजन्य रोग दिसत नसले तरी हवामान बदलांचा पीकावर परिणाम
होऊ शकतो. त्यामुळे पीक सुरक्षित राहण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना
करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
000000
Risk of Fungal Infection on
Summer Groundnut; Farmers Advised to Take Precautions !
Appeal from the Agri Department
Buldhana, March 19 : A large
area of summer groundnut has been sown in the district, and the crop is
flourishing in some areas. However, due to changes in weather conditions, high
moisture levels in the soil, and fluctuating temperatures, the risk of fungal
diseases affecting groundnut crops has increased. As a result, the Agriculture
Department has advised farmers to take timely precautions to prevent white
mold, root rot, and stem rot.
Current Status of Groundnut
Crop:
Proposed Sowing Area: 4,770
hectares
Area Sown So Far: 3,446
hectares
Symptoms of Fungal Infections:
Initially, the leaves of the
plants start turning pale yellow. Gradually, the plants begin to wither,
affecting overall production.Excessive moisture in the soil increases the risk
of root and stem rot.
Preventive Measures to Avoid
Fungal Infections:
Seed Treatment: Treat seeds
with Trichoderma viride (4 grams per kg of seed) or Carboxin 37.5% + Thiram
37.5% WP or Carbendazim 12% + Mancozeb 63% WP (3 grams per kg of seed).
Proper Soil Care:
Before sowing, treat 10–15 kg
of seeds with 250 grams each of Rhizobium and phosphate-solubilizing bacteria.
Ensure Proper Drainage:
Ensure good drainage during
sowing to prevent waterlogging. Excessive watering can increase the chances of
root and stem rot, so avoid overwatering.
Regular Crop Monitoring:
Monitor the plants for
yellowing of leaves or signs of white mold near the stem. If the plants show
signs of stunted growth, consult agricultural experts immediately.
Although no fungal infections
have been reported on groundnut crops yet, changing weather conditions may
affect the crop. Therefore, District Agriculture Officer Manoj Kumar Dhage has
urged farmers to implement these preventive measures to protect their crops.
000
Comments
Post a Comment