महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट
महसूल विभागाची धडक कारवाई;
खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट
बुलडाणा, दि. 25 (जिमाका): देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा
धरणामध्ये रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव
पथकाने दि. 24 मार्च रोजी मोठी कारवाई करत आठ बोटी नष्ट केल्या. तसेच अशा प्रकारच्या खडकपूर्णा धरणामध्ये अवैध उपसा करणाऱ्यावर नियमितपणे
कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी संबधिताना दिले.
खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये
अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग व जिल्हा स्तरीय शोध व
बचाव पथकाव्दारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेतर्गत दुपारी 4 वाजताच्या दरम्यान
मौजे गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार
इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या. त्यामधील मजूर पळून गेल्याने बोटी कोणाच्या
आहेत, यांची माहिती मिळू शकली नाही. सदर आठ बोटी धरणाच्या किनाऱ्यावर स्फोटके लावून
नष्ट करण्यात आल्या. सदर शोध मोहिम राबविताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अवैध
उपसा करणाऱ्या बोटी बेशरमाच्या झाडीमध्ये लपविण्यात आल्या होत्या. जिलेटिनच्या साहाय्याने
बोटी नष्ट करण्याची प्रक्रिया रात्री 8 वाजेपर्यंत राबविण्यात आली.
सदर कारवाई जिल्हधिकारी डॉ.
किरण पाटील व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, सायली
जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम
महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार,
संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, खडकपुर्णा प्रकल्प
उपविभागाचे अधिकारी एस. जे. तल्हार, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तरासिंग
पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत,
संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरक्षिक
नारायण गीते आदी उपस्थित होते. 0000000
Comments
Post a Comment