पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी तीन टँकर मंजूर

 

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी तीन टँकर मंजूर

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार अंढेरा येथे तीन टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.

 

  अंढेरा गावात 8700 पशुधन व 3886 लोकसंख्येसाठी तीन टॅकर 2 लक्ष 49 हजार 740 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता अंढेरा गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची पंचायत समिती यांनी नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या