अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती पारदर्शक पद्धतीने; कुठल्याही आमिषाला बळी पडू नका

 अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती पारदर्शक पद्धतीने;

कुठल्याही आमिषाला बळी पडू नका

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 5 :  बाल विकास प्रकल्प कार्यालय खामगाव अंतर्गत 23 ग्रामपंचायतीमध्ये दोन सेविका व 23 मदतनीस असे एकूण 25 रिक्त पदाची भरती होणार आहेत. या पदाकरीता शुक्रवार दि. 7 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्विकृत केले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांनी केले आहे.

 

 भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या