जिल्हा रुग्णालयात जागतिक श्रवण दिन साजरा
जिल्हा रुग्णालयात जागतिक श्रवण दिन साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : जागतिक आरोग्य संघटनेमार्फत दि. 3 मार्च हा
दिवस जागतिक श्रवण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जिल्हा रुग्णालयात जागतिक
श्रवण दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी श्रवण आजार व
निदानाच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले.
श्रवण व
श्रवण संबंधी उद्भवणाऱ्या विविध आजारांबाबत जनजागृती निर्माण व्हावी व प्राथमिक
अवस्थेत श्रवणव्याधींचे निदान होवून योग्य वेळी उपचार व्हावे हा त्यामागचा प्रमुख
हेतू आहे. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे “Changing Mindset-Empower
Yourself To Make Ear & Hearing Care A Reality Of All” ह्या थीमसह जागतिक श्रवण दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या
थीमनुसार जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा रुग्णालय येथे पार पडला. यावेळी जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक विश्वास खर्चे,
जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक तथा जेष्ठ कान नाक घसा तज्ञ डॉ.प्रशांत पाटील
तसेच मुख्य अधिपरिचारिका, जिल्हा परिचार्या, प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या,
प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होते.
श्रवण तज्ञ डॉ. सोनुने ह्यांनी राष्ट्रीय असंसर्गजन्य
रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर सुरु असलेल्या राष्ट्रीय कर्णबधिरता
प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांबाबत विस्तृत
प्रस्तावना उपस्थितांना विषद केली. जिल्हा स्त्री रुगणालयाचे अधीक्षक डॉ.प्रशांत
पाटील यांनी श्रवण आजारांबाबत प्राथमिक अवस्थेत निदानाच्या विविध पद्धतीचा उपयोग
शासकीय यंत्रणेत कसा करावा या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय
भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या थीमनुसार
जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिक प्रभावीपणे
कशाप्रकारे पुरविण्यात येतील याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे प्रभारी जिल्हा कार्यक्रम
समन्वयक डॉ. पंकज राठोड ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा
रुग्णालयातील डी.ई.आय.सी. विभागातील भाषा व श्रवण तज्ञ डॉ. प्रियंका राठोड, कान
नाक घसा विभागातील अधिकारी भक्तराज मानतकर, स्वप्नील वायाळ ह्यांनी नियोजन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी डी.ई.आय.सी. विभागातील मनोविकार चिकित्सक सिध्दार्थ जाधव
ह्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
000000
Comments
Post a Comment