चिखली तालुक्यातील 20 महसूली गावांत सेविका व मदतनिस पदाची पदभरती
चिखली तालुक्यातील 20 महसूली गावांत सेविका व मदतनिस
पदाची पदभरती
बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प
चिखली अंतर्गत 20 महसूली गावांत 6 सेविका व 19 मदतनीस असे एकूण 25 रिक्त पदाची भरती
होणार आहेत. या पदाकरीता दि. 4 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज स्विकृत केले जाणार असून इच्छुक
उमेदवारांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांनी
केले आहे.
भरती प्रक्रिया अटी व शर्तीनुसार पारदर्शकपणे पार
पाडली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही गैरमार्गाचा
वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment