हिवरा आश्रम येथे 24 मार्च रोजी एक दिवसीय विश्वस्त परिषदेचे आयोजन
हिवरा आश्रम येथे 24 मार्च रोजी एक दिवसीय विश्वस्त परिषदेचे आयोजन
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
बुलढाणा विभागामार्फत जिल्ह्यातील विश्वस्तांसाठी एक दिवसीय विश्वस्त परिषदेचे आयोजन
करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या १३ जानेवारी
रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांनी क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी
१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले
आहेत.
या अनुषंगाने या एक दिवसीय विश्वस्त
परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ही परिषद स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम येथे
२४ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
या परिषदेस जिल्ह्यातील विश्वस्त,
विधीज्ञ आणि पक्षकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
बुलढाणा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment