Posts

Showing posts from March, 2025

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

  3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई यांचेकडून प्रत्येक जिल्हास्तरावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२५ करिता निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्याअनुषंगाने जिल्हातील निवडणूक दि. ३ एप्रिल २०२५ रोजी लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.वी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे घेण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील संबंधित मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.    सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी डॉक्टर्स हे मतदार असणार आहेत. बुलडाणा जिल्हयात एकूण २३११ मतदार आहेत. प्रत्येक मतदारास एकूण ९ (नऊ) मते देण्याचा अधिकार आहे. तसेच सदर निवडणूकीसाठी जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या लक्षात घेवून एकूण ५ मतदान केंद्र लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महीला रुग्णालय, टी.बी. हॉस्पीटल परीसर, धाड रोड, बुलढाणा येथे ठेवण्यात आलेले आहेत. मतदान गुप्त पध्दतीने महाराष्ट्र वैद्...

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

  पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर          बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये भालगाव व कोलारा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय अधिकारी यांनी दिली.   भालगाव येथे 1 हजार 620 पशुधन व 3 हजार 273 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 96 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. कोलारा गावाला 4 हजार पशुधन व 4 हजार 856 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 76 हजार 660 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

उष्णतेच्या लाटेमध्ये पिकांचे व्यवस्थापन; कृषि विभागामार्फत उपाययोजना जाहिर

  उष्णतेच्या लाटेमध्ये पिकांचे व्यवस्थापन; कृषि विभागामार्फत उपाययोजना जाहिर   बुलडाणा, दि. 27 (जिमाका):   उन्हाळाच्या कालावधीत उष्माघात व उष्णतेच्या लाटेमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत उपाययोजनसबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहे.   या मार्गदर्शक सूचनाचे शेतकऱ्यांनी अवलंब करावे, असे आवाहन जिलहा अधिक्षक कृषि कार्यालयाचे कृषि उपसंचालक अनुराधा गावडे यांनी केले आहे.   कृषि विभागाने निर्गमित उपाययोजना : उन्हाळ्यातील भूजल पातळी खालावते म्हणून शेतकऱ्यांनी पिकांना ओलीत करतेवेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही अशा पध्दतीने पाणी द्यावे. फळबाग, भाजीपाला या पिकांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा. ज्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होईल. पिकांना सिंचनासाठी आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर करावा, कारण उन्हाळ्यात भूजल पातळी खालावलेली असते. सध्याच्या हवामान परिस्थितीत पिकाला पाण्याचा ताण बसू नये, म्हणून 4 ते 5 दिवसांच्या...

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती; > शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

  राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती; > शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन   बुलडाणा, दि. 27 (जिमाका): राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागामार्फत विविध पदाकरीता शिकाऊ उमेदवारांची पदभरती करण्यात येणार आहे. तांत्रिक, व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक कागदपत्रासह 12 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.   > मेकॅनिक मोटार व्हेईकल(MMV) पदासांठी पात्रता - आयटीआय मेकैनिक मोटार व्यवसाय उत्तीर्ण(38 पदे). मेकॅनिक(डिझेल) पदासाठी पात्रता - आयटीआय मेकॅनिक(डिझेल) व्यवसाय उत्तीर्ण(16 पदे). मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर(MVBB) पदासाठी पात्रता - आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण(16 पदे). इलेक्टीशियन पदासाठी पात्रता- आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण(11 पदे), पेंटर पदासाठी पात्रता- आयटीआय पेंटर व्यवसाय उत्तीर्ण(4 पदे), टर्नर पदासाठी पात्रता - आयटीआय टर्नर व्यवसाय उत्तीर्ण(2 पदे), वेल्डर पदासाठी पात्रता-आयटीआय वेल्डर व्यवसाय उ...

अभियांत्रिक व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अर्ज आमंत्रित; > अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षेव्दारे होणार निवड

  अभियांत्रिक व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अर्ज आमंत्रित; > अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षेव्दारे होणार निवड   बुलडाणा, दि. 27 (जिमाका): आदिवासी विकास विभागातंर्गत बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश(NEET, CET/JEE) परीक्षेच्या तयारीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. प्रत्येकी 40 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षेद्वारे निवड केली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 9 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार ग.व्यवहारे यांनी केले.   सर्व शासनमान्यता प्राप्त शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आदिवासी विकास विभागातंर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, इएमआरएस शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील मार्च 2025 मध्ये इयत्ता 10 वीची परिक्षा दिलेल्या व शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 9 वी मधिल   गुणानुक्रमे प्रथम पाच मुले व   पाच मुली यांचे आवेदनपत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवास...

खामगांव तालुक्यातील अवसायनातील 15 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

  खामगांव तालुक्यातील अवसायनातील 15 संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन   बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :   खामगांव तालुक्यातील 15 सहकारी संस्थाची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सहायक निबंधक सहकारी संस्थाव्दारे करण्यात येत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 89(4) नुसार अवसायनातील संस्थाशी ज्या कोण्या व्यक्ती वा संस्थेविरुद्ध काही दावे असल्यास त्यांनी जाहिर सूचना प्रसिद्ध झाल्यचे तारखेपासून दोन महिन्याचे आत नोंदवावे लागणार आहे. त्यानंतर दाव्यांची दखल घेतली जाणार नाही, असे खामगांव सहकारी संस्थाचे सहायक निबंधक एस.के. गारोळे यांनी कळविले आहे.   महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 नुसार सहकारी संस्था अंतिम अवसायनात घेण्यात अलेल्या अहेत. या संस्थावर अवसायकाची नियुक्ती यापुर्वीच करण्यात आलेली आहे. यापुढील दाखल केलेल्या दाव्याचे   अनुषंगाने कोणत्याही दावा दाखल न झाल्यास त्यांनतर 15 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.   0000000

मिनी मंत्रालयाचा ३६ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

Image
  मिनी मंत्रालयाचा ३६ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर ·         प्रगत तंत्रज्ञान सक्षम समाज व शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना   बुलडाणा, दि. 26 (जिमाका):   बुलडाणा जिल्हा परिषदेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी 36 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज मंजूर करण्यात आले आहेत. सदर अर्थसंकल्प प्रगत तंत्रज्ञान, सक्षम समाज व शाश्वत ग्रामविकास या मुख्य संकल्पनेवर आधारीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी सांगितले.   २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ६३ लाख ३ हजार ७२९ रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेची स्वउत्पन्ना पोटी आरंभीच्या शिल्लकेसह एकुण महसुली जमा ३६ कोटी ७९ लाख ३१ हजार ७२९ रुपये आहे. तर प्रस्तावित खर्च ३६ कोटी १६ लाक्ष २८ हजार रुपये खर्च आहे. २०२५-२६ च्या स्वनिधी मुळ अर्थसंकल्पात इतर योजनासह वैशिष्टयपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.   खर्चाची तरतुद याप्रमाणे (आकडे रुपयात) : बांधकाम विभाग ६...

क्षय आरोग्य धाम येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा; तज्ज्ञांव्दारे क्षयरुग्णांना मार्गदर्शन

Image
  क्षय आरोग्य धाम येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा; तज्ज्ञांव्दारे क्षयरुग्णांना मार्गदर्शन बुलडाणा, दि. 26 (जिमाका):   क्षय बाधित रुग्णांमध्ये क्षय रोगाब‌द्दल जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्याने येथील क्षय आरोग्यधाम येथे क्षयरोग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञांव्दारे क्षयरोग बांधित रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.   क्षयरोगाबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण व्हावी, तसेच क्षय रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना गती देण्यासाठी 1982 पासून दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षय दिन साजरा केला जातो. क्षयरोग हा साथीचा रोग आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे दीड दशलक्ष लोक मृत्युमुखी पडत असतात. क्षय रोगाचे समूळ उच्चाटन व्हावे या उ‌द्देशाने हा दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळी राबविण्यात येतात. 2025 या वर्षासाठी "होय आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो!   वचनबद्ध व्हा! गुंतवणूक करा व वितरित करा! अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही थीम आशा, निकड आणि जबाबदारीचा एक शक्तिशाली सामूहिक संदेश देते.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुग्णालय...

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बुलडाणा, दि. 26 (जिमाका):   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील राहेरी बु. गावाजवळील खडकपुर्णा नदीच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता खडकपुर्णा नदीच्या पुलावरील काम पुर्ण होईपर्यंत जडवाहणाची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे. आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना-सिंदखेडराजा-किनगांवराजा-सुलतानपुर-मेहकर-मालेगांव या मार्गावरील वाहतूक जालना-देऊळगांवराजा-चिखली-मेहकर-मालेगांव या पर्यायी मार्गाने. तसेच मालेगांव-मेहकर-सुलतानपूर-किनगांवराजा-सिंदखेडराजा-जालना या मार्गावरील वाहतुक मालेगांव-मेहकर-चिखली-देऊळगावंराजा-जालना या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.   सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येईल. 00000

दिव्यांग व्यक्तींसाठी द्रोण पत्रावळी मशिन; शुक्रवारी होणार लाभार्थ्यांची निवड

  दिव्यांग व्यक्तींसाठी द्रोण पत्रावळी मशिन; शुक्रवारी होणार लाभार्थ्यांची निवड बुलडाणा, दि. 26 (जिमाका): दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान उंचावण्याकरिता जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागामार्फत सन 2024-25 साठी द्रोण पत्रावळी बनविण्याचे मशीन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ईश्वरचिठ्ठीव्दारे निवड करण्यात येणार आहे. तरी संबधित दिव्यांग बांधवानी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे कक्षात दि. 28 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   0000

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

  आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : आदिवासी उमेदवारांकरीता परतवाडा (जि. अमरावती) येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राकडून विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या   स्पर्धा परिक्षेची विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी दि. 27 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   प्रशिक्षण कालावधी दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2025 पर्यंत असा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.   प्रशिक्षणासाठी पात्रता : उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. किमान वय 18 ते ३० चे दरम्यान असावे, उमेदवार किमान एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण असावा, रोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावा. आवश्यक कागदपत्र : शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारीयांनी दिलेल...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

    महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन               बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : अन्न पदार्थामधील भेसळ ओळखण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी येथील महात्मा फुले विद्यालयात दि. 24 मार्च 2025 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अन्न पदार्थातील भेसळ कसे ओळखावे याबाबत तज्ज्ञांव्दारे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजागृती केली.               दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळे अपायकारक पदार्थाची भेसळ होत आहे. या अन्न्पदार्थातील भेसळीला घरच्या घरी तपासायचे आणि भेसळ आहे, की नाही हे ठरवायचे कसे यासाठीची जागृती करण्यासाठी फुड सेप्टी ऑन व्हील या फिरती अन्न व औषधी प्रशासन प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सादरीकरणासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेले अन्न व औषध विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ सत्यवान बादाडे यांनी प्रात्यक्षिकसह अन्न भेसळ ओळखयची कशी ...

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : कारागृहात बंदीस्त असलेल्या बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 25 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निवडण्यात आलेल्या कलासमुहाचे कलावंतांनी मनोरंजन व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. त्यानंतर बंद्यांना समुपदेशन व मार्गदर्शनही करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग व बुलढाणा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने “जिवन गाणे गातच जावे ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. समुपदेशक सतीष बाहेकर व डॉ. महेश बाहेकर यांनी बंद्यांना शारिरीक व मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले. त्यानंतर स्वरश्री इव्हेंटचे तनुश्री भालेराव व त्यांच्या कलावंतानी देशभक्ती, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केले. सदर गृपमध्ये अकोल्याचे गायक राजू सोनोने, कविता वरगट वादक संच यांनी आपली कला सादर करुन बंद्यांचे मनोरंजन केले. प्रसिध्द निवेदक चंद्रशेखर जोशी यांच्या सुत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी बंद्यांनी देखील आपल्या फर्माईशी पेश करुन प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे समन्वयक महेश इंगळे, सुभेदार बबन खंडारे, हवालदार संजय मदारकर, दिनेश डोंगरदिवे, रविद्र आंधळे, जितेश काळवाघे, चंद्रकांत महाले, राहूल जाधव तसेच सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी यांनी सहाकार्य केले. 000000

Image
  बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : कारागृहात बंदीस्त असलेल्या बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 25 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निवडण्यात आलेल्या कलासमुहाचे कलावंतांनी मनोरंजन व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. त्यानंतर बंद्यांना समुपदेशन व मार्गदर्शनही करण्यात आले.   सांस्कृतिक कार्य विभाग व बुलढाणा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने “ जिवन गाणे गातच जावे ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. समुपदेशक सतीष बाहेकर व डॉ. महेश बाहेकर यांनी बंद्यांना शारिरीक व मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले. त्यानंतर स्वरश्री इव्हेंटचे तनुश्री भालेराव व त्यांच्या कलावंतानी देशभक्ती, प्रबोधनात्मक व मनोरं...

'बाल आशीर्वाद' नावाची योजना केवळ अफवा; जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

  'बाल आशीर्वाद' नावाची योजना केवळ अफवा; जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : महिला व बाल विकास विभागाकडून 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून, हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.   'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये दि. 1 मार्च 2020   नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्या...

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर

  पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील पाच   गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये ढासाळवाडी, सैलानी, पिंपळगाव सराई, चौथा व पिंपरखेड या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.   ढासाळवाडी गावाला 2050 पशुधन व 254 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 86 हजार 880 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. सैलानी गावाला 150 पशुधन व 1008 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 24 हजार 660 लिटर्स पाणी, पिंपळगाव सराई गावाला 592 पशुधन व 5592 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 19 हजार 600 लिटर्स पाणी, चौथा गावाला 430 पशुधन व 1678 लोकसंख्येसाठी एक टँकर 72 हजार 100 लिटर्स व पिंपरखेड गावाला 450 पशुधन व 800 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 21 हजार 500 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रा...

अवैध रेती उपसा विशेष मोहिम; मौजे इसरुल येथे चार बोटी नष्ट

Image
  अवैध रेती उपसा विशेष मोहिम; मौजे इसरुल येथे चार बोटी नष्ट   बुलडाणा, दि. 25 (जिमाका):   अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये   विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बुलढाणा उपविभागीय कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन पथकाव्दारे खडकपूर्णा धरणातील अवैध उपसा करणाऱ्या मौजे इसरुल येथे आज दि. 25 मार्च रोजी मोठी कारवाई करत चार बोटी नष्ट केल्या, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.             सदर कारवाई जिल्हधिकारी डॉ. किरण पाटील व उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी तहसिलदार संतोष काकडे, संभाजी पवार, श्रीकृष्ण जाधव, मंडळ अधिकारी भगवानराव पवार, ग्राम महसूल अधिकारी योगेश भुसारी, ना.पो.का विलास पवार, सुनील डव्हळे, अनिल बोंद्रे, विनोद गिरी, नितीन काळे, महसूल सेवक प्रभाकर इंगळे, वाहन चालक संतोष भोपळे, तसेच   पोलीस विभागाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. तसेच ब्लास्टिंगसाठी सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे,...

धरणातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी यांचे निर्देश

  धरणातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी यांचे निर्देश बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : संपूर्ण राज्यात "पाणी आडवा, पाणी जिरवा" या योजनेंतर्गत   जलसंधारणाच्या कामाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात असणारे धरण, नद्या नाले यांचे सर्वेचे काम पूर्ण करण्यात आले असून यातील गाळ काढण्याच्या कामास प्रथम प्राधान्य देण्याचे   निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.   महाराष्ट्राला पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी व "सुजलाम सुफलाम होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात 'पाणी आडवा पाणी जिरवा" ही योजना युद्ध पातळीवर कार्यान्वित करण्यात आलेली असून यासाठी वेगळ्या निधीची राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवली आहे. यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ठीक ठिकाणाचे धरणातील गाळ काढण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत असून लहान मोठी धरणे, नद्या, नाले यातील गा...

विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

  विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौरावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. गुरुवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिवनी आरमाळ ता.देऊळगाव राजा येथे आगमन व पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी स्व.कैलास अर्जुनराव नागरे यांच्या कुंटुबियास सांत्वनपर भेट. सकाळी 9.30 वाजता शिवनी आरमाळ येथुन देऊळगाव राजा-जाफ्राबाद-सिल्लोड भराडी मार्गे पिशोरकडे प्रयाण करतील. 00000

महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट

  महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट बुलडाणा, दि. 25 (जिमाका):   देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणामध्ये रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने दि. 24 मार्च रोजी मोठी कारवाई करत आठ बोटी नष्ट केल्या. तसेच अशा प्रकारच्या   खडकपूर्णा धरणामध्ये अवैध उपसा करणाऱ्यावर नियमितपणे कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी संबधिताना दिले.             खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग व जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाव्दारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेतर्गत दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मौजे गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या. त्यामधील मजूर पळून गेल्याने बोटी कोणाच्या आहेत, यांची माहिती मिळू शकली नाही. सदर आठ बोटी धरणाच्या किनाऱ्यावर स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या. सदर शोध मोहिम राबविता...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने एवढा निश्चित करण्यात आलेला होता. तथापि दि. 10 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार उमेदवारांचा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच महिन्यांनी वाढविण्यात आला असून आता एकूण 11 महिने करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी दिली आहे.   जिल्ह्यातील शासकिय, निम शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, महामंडळे तसेच विविध आस्थापनेमध्ये सहा महिने   कार्यप्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा प्रशिक्षणार्थी यांनी पुढील पाच महिन्याच्या कार्यप्रशिक्षण कालावधी त्यांच्या संबंधित आस्थापनेवर दि. 30 एप्रिल, 2025 च्या आधी रुजू व्हावे. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5...

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी फेर अर्जासह कागदपत्र सादर करण्याचे आवाहन; > 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 मधील प्रमाणपत्र रद्द

  जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी फेर अर्जासह कागदपत्र सादर करण्याचे आवाहन; >       11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 मधील प्रमाणपत्र रद्द   बुलडाणा, दि. 25 (जिमाका):   उशिरा जन्म व मृत्यू नोंद केल्यामुळे प्रमाणपत्र देण्यावर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यामुळे ज्यांची जन्म-मृत्यू नोंदणी रद्द झाली आहे, त्यांनी सुधारित शासन निर्णयानुसार पुराव्यानिशी संबंधित तहसिलदार यांचेकडे फेरअर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.     उशिरा जन्म व मुत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.   त्यानुसार शासनाने दि. 21 जानेवारी 2025 नुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती. तथापि, दि. 17 मार्च 2025 रोजीच्या पत्रानुसार ही स्थगिती रद्द करण्यात आली असून       दि. 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत नि...