ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज आमंत्रित
ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : राष्ट्रीय
कृषी विकास योजनेंतर्गत जमिन सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ करिता मृद नमुन्यांची तपासणी
ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळांमार्फत करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय वार्षिक
कृती आराखड्यानुसार राज्यात ४४४ नवीन प्रयोगशाळांना मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यास
१५ प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रयोगशाळा
उभारणीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
केंद्र
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), पीएसीएस,
कृषी चिकित्सालये व कृषी व्यवसाय केंद्रे (AC&ABC), माजी सैनिक, बचत गट
(SHGs), शेतकरी सहकारी संस्था, निविष्ठा विक्रेते तसेच शाळा/कॉलेजमधील युवक-युवती यांना
प्रत्येकी 1 लक्ष 50 हजार रुपये अर्थसहाय्य
दिले जाणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज दिनांक १५ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन
वेळेत जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, बुलडाणा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या
नावे सादर करावेत. अधिक माहितीसाठी एस. एस. जाधव, उप कृषी अधिकारी (मो. ७०८३१८७०८२)
यांच्याशी संपर्क साधावा. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड
समितीमार्फत सोडत काढून अंतिम निवड करण्यात येईल.
पात्रता
: युवक/युवतीचे वय १८ ते २७ वर्षे, किमान १० वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण, आधारकार्ड
व पॅनकार्ड अनिवार्य, संगणक ज्ञान आवश्यक (MS-CIT प्रमाणपत्र), स्वतःची किंवा किमान
४ वर्षे भाडेकरार असलेली इमारत.
0000000
Comments
Post a Comment