अन्न व औषध प्रशासनामार्फत मार्गदर्शन शिबीर संपन्न
अन्न व औषध प्रशासनामार्फत मार्गदर्शन शिबीर संपन्न
बुलडाणा,
(जिमाका) दि. 8 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी
दिल्ली यांच्या ड्रग अवरनेस अँड वेलनेस नेव्हीगेशन ड्रग फ्री इंडीया (Drug
Awareness and Wellness Navigation for DRUG FREE INDIA (DAWN)) योजना 2025 अंतर्गत
अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत दि. 31 जुलै 2025 रोजी मार्गदर्शन शिबीर आयोजन
करण्यात आले. यावेळी अंमली पदार्थ व एनडीपीएस अॅक्टविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
तथा सहदिवाणी न्यायाधीश सचिव नितीन पाटील, प्रमुख मार्गदर्शक सरकारी प्रमुख विधीज्ञ
बचावपक्ष अॅड. सानप, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनाचे अध्यक्ष गजानन शिंदे, अन्न व औषध
प्रशासन सहायक आयुक्त (औषधे) गजानन घिरके, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल सदस्य
गणेश बंगाळे, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना सचिव निलेश गावंडे, दशरथ हूडेकर, दिनेश राजपूत,
नंदू साळोख, अभिजित निबांळकर तसेच जिल्ह्यातील प्रमुख घाऊक व किरकोळ, केमिस्ट बंधू-भगिनींनी,
औषध विक्रेते उपस्थित होते.
अॅड. सानप यांनी एनडीपीएस अॅक्टबाबत
सविस्तर मार्गदर्शन केले. तर न्यायाधीश नितीन पाटील यांनी अंमली पदार्थांचे सेवन, त्याचे
दुष्परिणाम व कायदेशीर तरतुदींची सखोल माहिती दिली. त्यानंतर गजानन घिरके यांनी जिल्ह्यातील
सर्व औषध विक्रेत्यांना एनडीपीएस अॅक्टनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
विना प्रिस्क्रिप्शन औषधी विक्री न करण्यासह प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही बसविण्याचे
निर्देश दिले. तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या
आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
000000
Comments
Post a Comment