स्वातंत्र्यदिनी बुलढाण्यात ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिर
स्वातंत्र्यदिनी बुलढाण्यात ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिर
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : राज्य
उत्पादन शुल्क विभाग आणि देशी-विदेशी लिकर असोसिएशन, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने
येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी “ऑपरेशन
सिंदुर सन्मान” महारक्तदान शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सहकार विद्यामंदिर हॉल, बुलडाणा येथे सकाळी ९.३० ते
5 या वेळेत होणार आहे. या रक्तदान शिबिरात बुलढाणावासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून
रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
रक्तसंकलनाची
जबाबदारी शासकीय रक्तपेढी बुलढाणा, शेगाव, खामगाव, लिलावती रक्तपेढी बुलढाणा, जनकल्याण
रक्तपेढी नांदुरा, दत्ताजी भाले रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर, आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी
अकोला या संस्थांकडे असेल.
कार्यक्रमास
जिल्ह्याचे मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार असून, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य
कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व संस्था प्रतिनिधी उपस्थित
राहणार असून नागरिकांनी समाजसेवेचा संदेश देत महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे
आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment