मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नवे अभ्यासक्रम सुरू; युवकांसाठी करिअरची संधी

 

मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नवे अभ्यासक्रम सुरू; युवकांसाठी करिअरची संधी

 

बुलढाणा, दि. 2 (जिमाका) :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर येथे २०२५ सत्रापासून न्यू एज कोर्सेस अंतर्गत सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) (१ वर्ष) आणि मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेहीकल (२ वर्ष) हे नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, त्यांना शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.

 

या दोन्ही कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. सदर कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. सौरऊर्जा व इलेक्ट्रिक वाहन या दोन्ही क्षेत्रांत भविष्यातील मागणी लक्षात घेता, ही संधी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

यापूर्वी अर्ज केलेले तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम निवडण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. संस्थेचे प्राचार्य यांच्या वतीने सर्व इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, या कोर्सेसमध्ये सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर येथे संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या