जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुक; अंतिम प्रभाग रचना जाहीर

 

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुक; अंतिम प्रभाग रचना जाहीर

 

बुलडाणा, दि. २२ ऑगस्ट : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार बुलडाणा जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक -२०२५ अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सदर अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट ८ (अ) व परिशिष्ट ८ (ब) या स्वरूपात तयार करण्यात आलेली असून ती आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व पंचायत समिती व तहसिल कार्यालयांचे सूचना फलक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

या अंतिम प्रभाग रचनेच्या प्रकाशनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया पुढे वेगाने गतीमान होणार असून, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व मतदारांना प्रभाग रचनेबाबत सुस्पष्ट माहिती मिळणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी