वैध मापन शास्त्र कार्यालयाचा मंगळवारी 'जनता दरबार'
वैध
मापन शास्त्र कार्यालयाचा मंगळवारी 'जनता दरबार'
बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : वैध मापन शास्त्र कार्यालयीन
प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे व ग्राहकांच्या
तक्रारींचे त्वरित निवारण करण्याच्या उद्देशाने उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र,
बुलढाणा कार्यालयाच्या वतीने 'जनता दरबार' हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या
उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 'जनता दरबार' आयोजित
करण्यात येणार आहे.. या दरबारात नागरिकांना कार्यालयाशी संबंधित शंका, तक्रारी
किंवा सूचना थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. या जनता दरबाराची वेळ दुपारी 1 ते 2
वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
नागरिकांनी
या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या अडचणी, शंका किंवा सूचना थेट कार्यालयात
उपस्थित राहून मांडाव्यात, असे आवाहन उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, बुलढाणा यांनी
केले आहे.
000000
Comments
Post a Comment